प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर नगर वाचन मंदिरची पंचवार्षिक निवडणूक (2021-2026) बिनविरोध झाली. अध्यक्षपदी प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ. नंदकुमार जोशी यांची तर उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठे यांची निवड करण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जून 2021 पासून प्रलंबित असणारी करवीर नगर वाचन मंदिरची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, अंतर्गंत हिशेब तपसणी आणि कार्यकारी मंडळ सदस्य या पदांसाठी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. अभिजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विवेक मंद्रूपकर, ऍड. पुंडलिक पाटील यांच्या निवडणूक मंडळाने काम पाहिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कार्यवाह ऍड. आशुतोष देशपांडे यांना श्याम कारंजकर, विवेकानंद सोनवडेकर, संजय वाघापूरकर आदींचे सहकार्य लाभले.
करवीर नगर वाचन मंदिरची नवी कार्यकारिणी अशी. अध्यक्ष,डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, अंतर्गंत हिशेब तपासणीस दीपक गाडवे, कार्यकारी मंडळ,‘शाहूकार’ प्रा. डॉ. रमेश जाधव, उदय सांगवडेकर, अभिजीत भोसले, डॉ. आशुतोष देशपांडे, प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे, अश्विनी वळिवडेकर, अनिल वेल्हाळ, नंदकुमार दिवटे, ऍड. केदार मुनीश्वर, सौ. मनिषा वाडीकर, डॉ. सौ. संजीवनी तोफखाने, मंगेश राव.