बेंगळूर/प्रतिनिधी
पात्रता परीक्षेच्या टक्केवारीच्या तुलनेत बर्याच विद्यार्थ्यांच्या रँक यादीमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) अंतर्गत बी.आर्च अभ्यासक्रमांची रँक यादी रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
३० ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या यादीमध्ये संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) च्या आधारे, पियू किंवा १२ वीच्या गुणांवर तसेच आर्किटेक्चर (नॅटा) किंवा राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा गुणांचा विचार केला होता. दरम्यान जेईई पेपर २ चा निकाल टक्केवारी व इतर नियमानुसार घोषित करण्यात आला, त्यामुळे गुणांची गणना करण्यात आणि निर्णय घेण्यामध्ये फरक पडला आहे.
उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनारायण यांनी केईएने प्रकाशित केलेल्या आर्किटेक्चर अभ्यासक्रमांच्या रँक यादीतील संशयाबद्दल माझ्याशी चर्चा करण्यात आली. दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत स्पष्टीकरण देताना केईएच्या अधिकाऱ्याने संबंधित विभाग आणि संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर यात सुधारणा केली जाईल आणि सुधारित रँक यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे म्हंटले आहे.