बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटक ग्रामविकास व पंचायत राजमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मंत्री ईश्वरप्पा यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाची लागण झाल्याचे कळताच शिवमोगा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री, वरिष्ठ भाजपा नेते ईश्वरप्पा यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु असून माझी प्रकृती स्थिर असल्याचे म्हंटले आहे. तसेच त्यांनी मी तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा स्वीकारून लवकरच बरे होण्याची आशा करतो, असे त्यांनी ट्विट केले. तसेच मंत्री ईश्वरप्पा यांना बरे होण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि इतर नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.