बेंगळूर/प्रतिनिधी
गुरुवारीपासून एक आठवडा कर्नाटकातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हंटले आहे.
दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यांत गुरुवारी आणि शुक्रवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे आणि त्याव्यतिरिक्त, या भागात शनिवार आणि रविवारी आॅरेंज व रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा इशारा देण्यात आला असल्याचे आयएमडीने सांगितले. दरम्यान, राजधानी बेंगळूरसह जुन्या म्हैसूर जिल्ह्यांमध्येही पाऊस पडत आहे. या भागात दिवसभर ढगाळ वातावरण दिसून येते, असे आयएमडीच्या अंदाजानुसार म्हटले आहे.