बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण यांची गुरुवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंत्री प्रभू यांना ड्रायव्हर, सुरक्षा कर्मचारी आणि पहिल्या मंत्र्याच्या वैयक्तिक सहाय्यक यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्याकडून संसर्ग झाला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मंत्री प्रभू यांनी कोरोना चाचणी केल्यांनतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मंत्री चव्हाण हे घरी उपचार घेत असून ते इतरांपासून अलग आहेत. तसेच त्यांनी अलीकडच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व कोरोना चाचणी करावी अशी विनंती केली आहे.