बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी ४३०नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दरम्यान राज्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९,४४,०५७ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १२,२५१ जणांचामृत्यू झाला आहे. तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या ५९५८ सक्रिय प्रकरणे आहेत.
गुरुवारी राज्यात ३४० रूग्ण कोरोनावर मात करत घरी परतले. तर आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९,२५,८२९ वर गेली आहे.
गुरुवारी एकूण ६८,१९४ चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत एकूण १.७८ कोटी चाचण्या झाल्या आहेत.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी २२८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात आतापर्यंत एकूण ४,०१,३२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३,९२,९८५ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. दरम्यान गुरुवारी बरे झालेल्या १२८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात सध्या ३,९२० रुग्ण उपचारात आहेत. तर आतापर्यंत ४४१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.