बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांत दैनंदिन कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण २ टक्क्यांहून अधिक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये उडुपी ३.५ टक्के, बिदर ३.१ टक्के, दक्षिण कन्नड आणि गुलबर्गा प्रत्येकी २.५ टक्के आणि बेंगळूर २.३ टक्के सकारात्मक दर नोंदविला आहे. बेंगळूरमध्ये अपार्टमेंट्स आणि शैक्षणिक संस्थांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: केरळमधील प्रवासाचा इतिहास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्षिणा कन्नड आणि उडुपी येथील रुग्णांमध्ये समावेश आहे.
कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सी.एन. मंजुनाथ यांनी, सरकारने “उत्सव, सामूहिक प्रार्थना, चित्रपट प्रक्षेपण इ. ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे नियोजन केले पाहिजे. तसेच त्यांच्यावर तात्पुरती बंदी घातली पाहिजे. राज्यात कोरोनाची दुसरी लहर आहे. नागरिक कोरोना गेल्याचे समजून नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन न केल्यास जबर दंड आकारला जाणार आहे.