बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली. राज्यात गुरुवारी १,५०५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर १,०७६ रुग्णांनी कोरोनावर मत करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तसेच राज्यात विविध जिल्ह्यातील १२ जणांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान राज्यात २५,३१६ रुग्ण सध्या उपचारात आहेत. तर आतापर्यंत ११,७२६ जणांचा बळी गेला आहे.
दरम्यान राज्यात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. गुरुवारी जिल्ह्यात ८४४ जणांना कोरोनाची लागण झाली. तर ३६७ लोक कोरोनावर विजय मिळवत घरी परतले. जिल्ह्यात सध्या १८,८३० रुग्ण उपचारात आहेत. गुरुवारी कोरोनाने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात आतापर्यंत ४१०८ जण कोरोनामुळे मृत्य पावले आहेत.