बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये सोमवारी १,०६५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. याच वेळी १,४८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २९,३०,५२९ वर पोहोचली असून यापैकी २८,७१,४४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे एकूण ३७,००७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी २७० कोरोना रुग्ण सापडले आहेत आणि ३७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या २२,०४८ आहे. तर सोमवारी राज्यात कोरोना सकारात्मकता दर ०.९३ टक्के होता, तर केस मृत्यू दर (सीएफआर) २.६२ टक्के होता.
दरम्यान २८ मृत्यूंपैकी ५ मृत्यू दक्षिण कन्नड,बेंगळूर शहरी आणि म्हैसूर प्रत्येकी ४, हसना आणि कोडगु प्रत्येकी ३, चित्रदुर्ग, कोलार आणि उत्तर कन्नड प्रत्येकी २ आहेत. तर राज्यात सोमवारी दक्षिणा कन्नड जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २८४, बेंगळूर शहरी २७०, उडुपी १०७, म्हैसूर ६३ तर अन्य जिल्ह्यात रुग्ण सोडले आहेत.