बेंगळूर/प्रतिनिधी
ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील कलिंगानगरहून १२० एमटी द्रव वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) घेऊन कर्नाटककडे निघालेली दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी सकाळी बेंगळूरला पोहोचली. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. तिसरी ट्रेन झारखंडमधील टाटानगरहून १२० मेट्रिक टन एलएमओसह शनिवारी सायंकाळी बेंगळूर येथे पोहोचेल, असे दक्षिण पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ट्विट करत १२० मे.टन ऑक्सिजन घेऊन आलेली दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस आज पहाटे बेंगळूरला पोहोचली आणि तिसरी ट्रेन अतिरिक्त १२० मे.टन एलएमओसह आज सायंकाळी दाखल होईल, अशी माहिती दिली.
कर्नाटकात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस मंगळवारी ११ मे ला दाखल झाली होती. १२० टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस मंगळवारी बेंगळूर शहरात पोहोचली होती.