बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली पहायला मिळाली. राज्यात बुधवारी ९,२६५ नवीन रुग्ण आढळले. तर ८६६२ रूग्णांना कोरोनमुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७,३५,३७१ वर पोहोचली आहे. यापैकी ६,११,१६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान राज्यात १,१३,९८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत १०,१९८ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यापैकी ७५ रुग्णांचा मृत्यू बुधवारी झाला आहे. राज्यात आयसीयूमध्ये ९२५ रुग्ण दाखल आहेत.
गेल्या २ ४ तासात राज्यात ३९,१११ जलद प्रतिजैविक आणि ७४,६८० आरटी-पीसीआर चाचणीसह एकूण १,१३,७७१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण ६२,५०,९९२ कोरोना चाचणी करण्यात आली आहे.