बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात शुक्रवारी ३८० नवीन बाधितांची भर पडली. तर ४०५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ३८० पॉझिटिव्ह रुग्णांसह राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९.४४ लाखावर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,२५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात युकेमधील कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण झालेल्या चार नवीन घटनांची नोंद झाली. यासह नवीन विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ झाली आहे. जवळपास ४०५ रुग्णांना या विषाणूवर मात केल्याने घरी सोडण्यात आले. दरम्यान राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९.२६ लाखांवर गेली आहे. दरम्यान राज्यात सध्या ५,९२५ रुग्ण उपचार घेत आहेत.