बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारी राज्यभरात आणखी १,७८१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २,१८१ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तर १७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ८,६९,५६१ वर पोहोचली आहे. यापैकी ८,३३,१६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २४,७५२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
दरम्यान आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ५३९ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासात कोरोना सकारात्मकता दर १.४६ टक्के आहे.
नेहमी प्रमाणे बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी जिल्ह्यात १,०६७ रुग्ण सापडले. तर १,२५४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले.