बेंगळूर/प्रतिनिधी
डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे कर्नाटकच्या चार रस्ते वाहतूक महामंडळांनी सार्वजनिक वाहतुकीचे भाडे किमान २० टक्क्यांनी वाढविण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव मांडला आहे.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ शिवयोगी सी. कलसद आणि उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा बाजपेयी यांनी कामकाजाचे नुकसान कमी करण्यासाठी बसचे भाडे वाढविणे महामंडळांना अपरिहार्य आहे, असे म्हंटले आहे.
दरम्यान डिझेल दरवाढीमुळे १५ टक्के किंवा २० टक्के भाडे वाढल्यास आरटीसीचे ऑपरेटिंग नुकसान कमीतकमी ५० टक्के कमी होईल.
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान इंधनाच्या किंमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत चार आरटीसीने मिळून एकूण २,५०० कोटी रुपये तोटा झाला आहे. यामध्ये कोरोना आणि लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानाचा समावेश आहे.