बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मंत्री आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते एच. डी. रेवन्ना यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
जेडीएस च्या माहितीनुसार गुरुवारी सुरक्षा कर्मचार्याच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रेवन्ना यांनी कोरोना चाचणी केली होती.
हसनमधील होलनारासिपुरा मतदारसंघातील जेडी (एस) चे आमदार असलेले रेवन्ना यांना उपचारासाठी बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.