बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे 11 दिवसीय अधिवेशन पुढील महिन्यात बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. तथापि, दोन्ही सभागृहांची बैठक विधानसभेमध्ये किंवा अन्यत्र होणार आहे, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळाने गुरुवारी राज्यपालांकडून 21 ते 30 सप्टेंबरदरम्यान दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलवण्याचासाठी विनंती केली. या बैठकीनंतर कायदा व संसदीय कार्यमंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली असल्याची माहिती दिली.
अधिवेशनाचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही, परंतु दोन्ही सभागृहांची बैठक बेंगळूर येथे होणार आहे. मधुस्वामी यांनी सामाजिक अंतर पाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे सभापती व विधानपरिषदेच्या अध्यक्षांशी बैठक घेण्यासंदर्भात ठिकाण निश्चित करण्यास सांगितले आहे. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी पंधरवड्यापूर्वी वैकल्पिक बैठकीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
घटनात्मक तरतुदीनुसार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या दोन बैठकींमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू शकत नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे विधिमंडळ अधिवेशन नियोजित वेळेपूर्वी २४ मार्च रोजी तहकूब करण्यात आले. यामुळे २३ सप्टेंबरपूर्वीच्या दोन्ही बैठका घेणे घटनात्मक बंधनकारक आहे.