बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक बार कौन्सिलच्या प्रतिनिधींनी गुरुवारी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. यावेळी बार कौन्सिलच्या सदस्यांनी राज्यपालनकडे दक्षिणेकडील भागात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाची स्थापना करण्याची विनंती केली.यावेळी चेअरमन एल. श्रीनिवास बाबू, सचिव अरुण पुजार, सदस्य बी. व्ही. श्रीनिवास आणि अन्य सदस्य उपस्थित होते.
दरम्यान आज कर्नाटक बार कौन्सिल सदस्यांनी राज्यपालाची घेतली भेट घेऊन दक्षिणेकडील भागात सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ व्हावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले.