बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता वर्तविल्या जात असलेल्याचे वक्तव्य केल्यामुळे या प्रक्रियेला आणखी विलंब होत असल्याचे सूचित केले जात आहे. याआधीही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. पण वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला होकार दिला नव्हता.
मंत्रिमंडळ विस्तारावरून पक्षात भुसपूस सुरु आहे. बंडखोरी करत पक्षात आलेल्या आणि त्यांनतर निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेते (भाजपचे) निर्णय घेतील. कुणी (इच्छुक) विधान केले असेल … मी वचन का द्यावे? स्वाभाविकच ज्याला मंत्री व्हायचे आहे ते होतील, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना हे विधान केले.
या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया या महिन्यात होईल अशी शक्यता वर्तविली जात असल्याच्या अनुषंगाने काही मंत्रीपदाच्या इच्छुक आमदारांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा एमएलसी आर. शंकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली आणि नंतर हा विस्तार २ -३ दिवसात होईल असा दावा केला आणि त्यांना मंत्री बनविण्यात येईल.
तथापि, शंकर यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव आणि आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी स्पष्टीकरण दिले होते की अद्याप विस्तार किंवा फेरबदलाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी त्यांना योग्य वेळी निर्णय घेण्याची सूचना केली आहे.
येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार संदर्भात उच्च कमांडकडे बोट दाखवले आहे, तर कर्नाटकचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी रविवारी शिमोगा येथे पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची कबुली दिली होती. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते.
१८ नोव्हेंबरला नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत येडियुरप्पा मंत्रिमंडळातील कामकाज करण्यासाठी काही काळ थांबले होते. केंद्रीय अध्यक्षांकडून मंजुरी मिळावी म्हणून त्यांना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती.