बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बुधवारी बारावी बोर्डाची परीक्षा मेच्या दुसर्या आठवड्यात आणि एसएसएलसी म्हणजेच दहावी बोर्डाची परीक्षा परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. मंत्री सुरेश कुमार यांनी परीक्षेसंदर्भात नेमके वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले.
दर वर्षी, बारावीच्या परीक्षा मार्चमध्ये आणि त्यानंतर एसएसएलसीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरम्यान कोरोनामुळे दहावी आणि बारावीचे वर्ग १ जानेवारीपासून वर्ग सुरू झाले आहेत. याआधी हे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेतले जात होते.
अभ्यासक्रमाविषयी भूमिका स्पष्ट करताना मंत्री कुमार यांनी ते सर्व शाळा व महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचा आराखडा पाठवतील. तसेच त्यांनी इयत्ता १ ते ९ च्या अभ्यासक्रमामध्ये कोणतीही कपात होणार नाही, असे म्हंटले आहे.