क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
तिपटूर जि. तुमकुर जिल्हा येथे कर्नाटक राज्य खोखो संघटनेतर्फे बेळगाची खोखो पटु सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांता गडकरी यांचा खास सत्कार करण्यात आला.
तिपटूर येथे कर्नाटक राज्य खोखो संघटनेच्या वतीने खोखो खेळात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या क्रिडा पटुंचा खास सत्कार समारंभ करण्यात आला होता. बेळगावात महिला खोखो पटुंनी संपूर्ण कर्नाटक त्याचप्रमाणे देशात नाव लौकिक केलेल्या खेळाडुंपैकी एक म्हणजे शांता गडकरी आहे. शांता गडकरीने खोखो क्षेत्रात राष्ट्रीय स्पर्धेतून चमक दाखवून एकलव्य पुरस्कार मिळविला आहे. या सर्वाची दखल घेऊन कर्नाटक राज्य खोखो संघटनेच्या वतीने शांता गडकरी यांचा शाल-श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून राष्ट्रीय अध्यक्ष त्यागी व लोकेश व मल्लीकार्जुन यांच्या हस्ते सत्कार केला. शांता गडकरी यांची कर्नाटक राज्य खोखो निवड समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या बेळगावमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रूजु आहेत.