बेंगळूर/प्रतिनिधी
भाजप नेते आणि माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या लैंगिक गैरव्यवहार प्रकरणावरून गदारोळ झाला. दरम्यान या गदारोळात बुधवारी कर्नाटक विधानसभेत वित्त विधेयक मंजूर झाले. सलग तिसर्या दिवशीही विधानसभेत या पार्कर्णावरून गदारोळ पहायला मिळाला.
दरम्यान कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत लैंगिक गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाने परीक्षण केले जावे आणि रमेश जारकिहोळी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी करत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बुधवारीही विधानसभेत कामकाजावेळी अडथळा आणला. तसेच त्यांनी “नैतिकदृष्ट्या अपात्र” असल्याचे सांगून त्यांच्याविषयी कोणतीही असत्यापित बातम्या प्रसिद्ध करण्यास किंवा प्रसारित करण्याच्या आदेशावरून कोर्टात धाव घेणाऱ्या सहा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.