बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळ आणि पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली.
बैठकीनंतर येडियुरप्पा यांनी वीरशैव-लिंगायतांना इतर मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला अंतिम रूप देण्यापूर्वी ते नवी दिल्लीला जातील आणि वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे विचारात घेऊन पुढील निर्णय घेतील. त्यामुळे वीरशैव-लिंगायत समाजाला ओबीसी दर्जाबाबतचा निर्णय पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत पुढे ढकलला आहे.
तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अजून सुटलेला नाही. पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून कोणतीही सूचना दिलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत येत्या २ ते ३ दिवसात निर्णय होईल असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हंटले.