बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी बुधवारी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंना जागतिक दर्जाचे शिक्षण देणार्या संस्थांमध्ये संभाव्य प्रतिस्पर्धी असण्याचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीविषयी चर्चा करण्यासाठी राज्य विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत राज्यपाल वजुभाई वाला यांनी बेंगळूर हे एक शैक्षणिक केंद्र आहे ज्याचे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि संशोधन क्षेत्रात देशात पहिले स्थान आहे. जर सरकार विद्यापीठांत १०० टक्के कर्मचारी प्रदान करते तर आपण १०० टक्के निकाल साध्य करू शकतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री सी.एन. अश्वथनारायण यांनी राज्यपाल यांना विश्वेश्वरैया तंत्रज्ञान विद्यापीठ, राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ (आरजीयूएचएस) आणि बेंगळूर विद्यापीठाचा समन्वयक असण्यासाठी तांत्रिक समिती तयार करण्यास सांगितले.