बेंगळूर /प्रतिनिधी
रुग्णालयात नऊ दिवस उपचार घेतल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची बुधवारी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
४ ऑगस्ट रोजी सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना बेंगरूळच्या मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कार्यालयाच्या निवेदनानुसार, दुसर्या वेळी घेण्यात आलेल्या घश्याच्या स्त्राव व रक्त चाचणीअहवाल निगेटिव्ह आला असून सिद्धरामय्या यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
७२ वर्षांच्या सिद्दरामय्या यांना सुरुवातीच्या दोन दिवसात ताप आला आणि मणिपाल रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आता संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे आमदार डॉ. यथिंद्र सिद्धरामय्या यांची ७ ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी पिझिटिव्ह अली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा सुद्धा सोमवारी रोनमुक्त झाले आहेत.