बेंगळूर/प्रतिनिधी
देशात १ मे पासून १८ ते ४४ वर्षाच्या व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान कर्नाटक सरकारने मात्र पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे बेंगळूर आणि उर्वरित कर्नाटकात १ मे रोजी १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना कोविड -१९ लसीकरण केले जाणार नाही, असे म्हंटले आहे. लस उपलब्ध झाल्यांनतर नागरिकांना कळविले जाईल त्यांनतर लसीकरण सुरु होईल अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
मंत्री सुधाकर यांनी त्यांनी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यास सांगितले आणि साठा आल्यावर सरकार त्यांना कळवेल तो पर्यंत प्रतीक्षा करावी, असे ते म्हणाले.
“सुमारे९९ ५ लाख डोसपैकी ९५ लाख पेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. आमची लस वाया जाण्याचे प्रमाण केवळ १.४ टक्के आहे. काल चार लाख डोस आले आहेत. मला माहिती आहे की आमच्याकडे जवळपास सहा लाख डोस आहेत, ” असे त्यांनी सांगितले.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ५ ते ६ कोटी लस डोस तयार करते, तर भारत बायोटेक महिन्यात १-१.२५ कोटी डोस तयार करते. डॉ. रेड्डीज निर्मित रशियाची स्पुतनिक व्ही. अद्याप येणे बाकी आहे.
मंत्री सुधाकर यांनी मला उद्या लसीकरणासाठी कुठे जायचे आहे असे कॉल्स व संदेश येत आहेत. कृपया उद्या रुग्णालयांना भेट देऊ नका. लस कधी दिली जाईल याची आम्हाला सीरम कडून माहिती मिळालेली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांनी लसीकरण्याच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे ते म्हणाले.