कोरोना संकटामुळे व्यवसाय कमी झाल्याने फ्रान्समधील जगप्रसिद्ध अन्नप्रक्रिया कंपनी डानोन आपले 2 हजार कर्मचारी कमी करणार आहे. कंपनीच्या एकंदर कमचारी संख्येपैकी हे प्रमाण 2 टक्के आहे. यामुळे कंपनीचे 2023 पर्यंत 1 अब्ज डॉलर्स (साधारणतः 74 हजार कोटी रूपये) वाचणार आहेत. मात्र कर्मचारी कपातीमुळे कामगारांमध्ये नाराजाची भावना आहे.
फ्रान्समधील इतर अन्नप्रक्रिया कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीला बसलेला कोरोनाचा फटका जास्त आहे. याला कंपनीचे व्यवस्थापन उत्तरदायी आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे.