वार्ताहर /काकती :
काकती येथील गावकरी ढाब्याजवळ ऊस घेऊन जाणाऱया ट्रक्टरची ट्रॉली पलटी होऊन ऊस कोसळला. बुधवारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार हिरेबागेवाडी येथून उसाने भरलेला ट्रक्टर बेळगाव राष्ट्रीय महामार्गाने साखर कारखान्याला जात होता. यमनापूर पुढील गावकरी ढाब्याजवळ मिनी प्रवासी बसने सर्व्हिस रस्त्यावरून महामार्गावर ओव्हरटेक केली. या मिनी बसला साईड देताना ट्रक्टरच्या चाकांना रस्ता दुभाजकाचा धक्का लागून ट्रक्टरची ट्रॉली पलटी झाली. त्यावेळी बाजूला कोणतेही वाहन आले नसल्याने कोणतेही अधिक हानी झाली नाही. हा ट्रक्टर बीड (महाराष्ट्र) येथील ऊसतोडवाल्या ठेकेदाराचा आहे. काही प्रमाणात ट्रॉलीचे नुकसान झाले आहे. सायंकाळी सहाच्यानंतर दुसऱया ट्रॉलीला ऊस भरून कारखान्याला पाठविण्यात आला.