वीरकुमार पाटील यांची माहिती : प्रमुख नेते राहणार उपस्थित
प्रतिनिधी/ कागवाड
कागवाड व अथणी तालुक्मयातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवार 12 रोजी सकाळी 11 वाजता ऐनापूर-मंगसुळी मार्गावरील निलांबिका सभागृहामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी कागवाड येथे बोलताना दिली.
रविवारी माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत निलांबिका सभागृहाची पाहणी केली. यावेळी कार्यकर्त्यांना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मोर्चेबांधणी व इतर माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात पक्षाचे कार्याध्यक्ष सतीष जारकीहोळी, माजी गृहमंत्री एम. बी. पाटील, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यासह जिल्हय़ातील काँग्रेसचे ज्ये÷ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असेही वीरकुमार पाटील यांनी सांगितले.
यावेळी केपीसीसी सदस्य दिग्विजय पवार-देसाई, ऐनापूर शांतीसागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र गाणीगेर, बाळासाहेब विसापुरे, वीरभद्र कटीगेरी, राहुल कटीगेरी, ज्योतीकुमार पाटील, विजय अकीवाटे, ओमप्रकाश पाटील, महादेव कटीगेरी, राजू कुसनाळे, संजय बिरडी, बाळकृष्ण पाटील, शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते.