रस्त्यावर, घरांवर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्मयात सोमवारपासून चालू असलेला वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे कित्येक ठिकाणी रस्त्यावर तसेच घरावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून त्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. वादळी वाऱयामुळे करमलघाट, गुळे, मोखर्ड, भाटपाल, माशे, पैंगीण येथे रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर दूरध्वनी सेवा पूर्णपणे बंद पडली आहे.
आतापर्यंत या तालुक्मयात एकूण 107 इंच इतक्मया पावसाची नोंद झालेली आहे. मोखर्ड भागात भरपूर हानी झालेली असून या भागातील बागायतींमधील माड तसेच केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. कोर्नमळे येथील एका गॅरेजवर झाड पडल्यामुळे गॅरेजमधील कारचे नुकसान झाले. भाटपाल येथे दिनेश देसाई यांच्या जुन्या घरावर फणसाचे झाड कोसळण्याची घटना घडली.
किनारपट्टी भागांनाही या वादळी स्थितीचा मोठा तडाखा बसला असून पाटणे-कोळंब येथील अभय धुरी यांच्या घरावर माड कोसळला आहे, तर किनारपट्टीवरील काही आस्थापने भुईसपाट झालेली आहेत. नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने नजीकचे परिसर जलमय झाले आहेत. आगोंद किनाऱयावरही या वादळाने हानी केली असून या किनाऱयावरील काही अस्थापने भुईसपाट झाली आहेत. सर्वांना धोक्मयाचा इशारा देण्यात आला आहे.