बेंगळूर/प्रतिनिधी
पॅराग्लायडिंग दरम्यान झालेल्या अपघातात भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृताची ओळख इंडियन नेव्ही कॅप्टन मधुसूदन रेड्डी (वय ५४) अशी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात पॅरामोटरचे मालक डॉ. विद्याधर वैद्य (वय ६०) आणि वैमानिक दोघे बचावले आहेत.
पॅराग्लायडिंग दरम्यान कॅप्टन मधुसूदन रेड्डी हे अरबी समुद्रात कोसळले. कारवारमधील रवींद्रनाथ टागोर बीचवर पॅरामोटरिंग दरम्यान मोटरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला. यावेळी रेड्डी यांना किनाऱ्यावर आणले असता ते जिवंत असल्याचे पोलिसांनी दावा केला. परंतु, पोलिसांनी बोलविलेली रुग्णवाहिका वेळेवर आली नाही. यावेळी रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना पोलीस जीपने कारवार जिल्हा रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी हे कारवार येथील इंडियन नेव्ही बेस सी बर्ड येथे काम करीत होते. ते आपल्या कुटुंबातील सदस्यांसह समुद्रकिनाऱ्यावर आले होते. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी पॅरामोटरिंगमध्ये भाग घेतला आणि शेवटीते पॅराग्लायडिंगचा आनंद घेत असताना मोटरमध्ये काहीतरी काहीतरी बिगड झाल्याने ते थेट पाण्यात पडले. पण पाण्यातून बाहेर काढूनही त्यांचा मृत्यू झाला.