बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. अल्पकालावधीत कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. लवकरच कार्तिक आर्यन आगामी ‘शहजादा’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. परंतु कार्तिक आर्यनने ‘शहजादा’साठी निर्मात्यांकडे फीस वाढवून मागितली आहे. यामुळे सध्या कार्तिक आपल्या वाढवलेल्या फीसमुळे चर्चेत आला आहे.कार्तिक आर्यनने आपल्या आगामी शहजादा चित्रपटासाठी निर्मात्यांकडे 21 कोटी रुपयांची मागणी केली आहे. एवढी मोठी मागणी करूनही निर्मात्यांनी कार्तिककडे पाठ फिरवली नसून त्याची ही मागणी स्वीकारली आहे. 2011 मध्ये कार्तिकने ‘प्यार का पंचनाम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कार्तिकचा हा चित्रपट मोठय़ा बजेटचा नव्हता, परंतु तरुणांच्या पसंतीस हा चित्रपट पडला. त्यानंतर ‘प्यार का पंचनाम 2’मध्ये कार्तिकच्या अभिनयाने कमालच केली.कार्तिकच्या आर्यनच्या आयुष्यात वेगळे वळण ‘सोनू के टीटू की स्वीटी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटानंतर कार्तिकला काही मोठे प्रोजेक्ट मिळाले आणि त्यानंतर कार्तिकने कधीच मागे वळून पाहिले नाही. कार्तिक आता बॉलिवूडमधील व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. त्याच्याकडे बरेच चित्रपट आहेत.‘शहजादा’ चित्रपटात कार्तिक क्रिती सनॉनसोबत रोमांस करताना दिसणार. यापूर्वी कार्तिक क्रितीसोबत ‘लुका छुपी’मध्ये दिसला होता. कार्तिक व क्रितीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे निर्मात्यांनी पुन्हा दोघांना एकत्र घेऊन चित्रपट करण्याचा निर्णय घेतला
Previous Articleसमभागांमध्ये गुंतवणुकीत युवक पुढे
Next Article अंदमान-मणिपूरमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.