हत्तरगी जवळील घटना, पत्नी जखमी
प्रतिनिधी बेळगाव
हत्तरगी टोल नाक्मयाजवळ सोमवारी दुपारी झालेल्या कार अपघातात कणबर्गी (ता. बेळगाव) येथील एका वृध्दाचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सिद्राय रायाप्पा मुचंडीकर (वय 64, रा. कुंभार गल्ली, कणबर्गी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवीचे नाव आहे. पत्नी लक्ष्मी सिद्राय मुचंडीकर (वय 55) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
कारमधून हिडकल डॅमहून बेळगावकडे येताना हिडकल डॅमकडे जाणाऱया दुसऱया कारने धडक दिल्याने ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी 7 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. कणबर्गी येथील मराठी प्राथमिक शाळेचे माजी एसडीएमसी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुचंडीकर यांचे ते वडील होत. गुरुवारी रक्षाविसर्जन होणार आहे.