दावोस / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रकरणी हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेत मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेची तयारी असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. काश्मीरमधील परिस्थितीवर अमेरिकेची नजर असून यापुढेही राहणार आहे. तसेच चर्चेच्या फेऱयांमध्येही निश्चितपणे मदत करू, असे ट्रम्प म्हणाले.
स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी काश्मीर मुद्यावर चर्चा केली. काश्मीरमधील परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत, असे यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत काश्मीर मुद्यावर चर्चा करत असल्याचे सांगितले आहे. ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱयावर येण्याची शक्मयता असून त्याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्यासोबत काश्मीर मुद्यावर चर्चा केली जात आहे.
भारत उधळणार मध्यस्थीचे मनसुबे
गेल्यावषी इम्रान खान अमेरिका दौऱयावर गेले असताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपली मदत मागितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, भारताने काश्मीर ही आमची अंतर्गत बाब असल्याचे सांगत मध्यस्थीचा प्रस्ताव साफ फेटाळून लावला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांनी दावोसच्या भूमीवरून पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. भारताने मात्र तिसऱया देशाच्या मध्यस्थीला पूर्वीपासूनच विरोध दर्शवलेला असल्याने अमेरिका-पाकिस्तानचे चर्चा-मध्यस्थीचे मनसुबे उधळले जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान एकाकी, भारत प्रभावी : सीआरएसचा अहवाल
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला पाकिस्तानकडून खतपाणी घातले जात असल्याने जागतिक पातळीवर पाकिस्तानबद्दल फार कमी विश्वासार्हता उरली असल्याचे अमेरिकन विश्लेषकांचे मत आहे. लष्करी कारवाईने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलण्याची धमक पाकिस्तानमध्ये नसल्यामुळे पाकिस्तानला डिप्लोमसीवर सर्वाधिक अवलंबून रहावे लागणार आहे. अमेरिकेच्या काँग्रेशनल अहवालात यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली असून जम्मू-काश्मीरसंबंधी भारताने घेतलेल्या निर्णयावर प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे फारच कमी पर्याय उपलब्ध असल्याचेही म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यातील काश्मीरसंबंधीचा त्यांचा हा दुसरा अहवाल आहे. ‘सीआरएस’ हा अमेरिकन काँग्रेसचा स्वतंत्र संशोधन विभाग आहे. अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीकोनातून अमेरिकन कायदे मंडळाच्या प्रतिनिधींसाठी ठराविक कालावधीने ‘सीआरएस’कडून असे अहवाल बनवले जातात. या ताज्या अहवालामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला असून भारताची वाटचाल प्रभावी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.