श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी आता पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. काश्मीर खोऱयात हिमवर्षावास प्रारंभ झाल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले असून अनेक पर्यटक हिमवर्षावाचा आनंद लुटताना दिसत आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच येथे पर्यटकांची अशी गर्दी पहावयास मिळाल्याचे अनेक स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने सोयींची व्यवस्था केली आहे.
यावर्षी नोव्हेंबरमध्ये काश्मीर खोऱयाला 1 लाख 3 हजार पर्यटकांनी भेट दिली. डिसेंबरात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या सात वर्षांमधला हा नोव्हेंबरातील उच्चांक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. हिमवर्षावास प्रारंभ झाल्यानंतर पर्यटकांनी गर्दी वाढते असा अनुभव आहे. यावेळी पर्यटक निर्भयपणे या भागात येत आहेत, असेही दिसून आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शिखरांवर हिमाचे आच्छादन गेले दोन दिवस काश्मीर खोऱयात मोठय़ा प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे हिमालयाची अनेक शिखरे हिमाच्छादित झाली आहेत. किमान 1 फूट उंचीचा हिमाचा थर पर्वतांवर पसरला आहे. गुलमर्ग हे जगातील सर्वोत्तम ’स्कीईंग’ स्थान मानले जाते. हिमवर्षावाच्या काळात या स्कीईंगलाही बहर येतो. यंदा पर्यटकांची संख्या आणि उत्साह अवर्णनीय असल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे