नवी दिल्ली
वाहन कंपनी किया इंडियाची विक्री ही जुलै महिन्यात 76 टक्क्यांनी मजबूत होत 15,016 युनिटवर राहिली आहे. एक वर्षाअगोदर समान कालावधीत हा आकडा 8,502 इतका राहिला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जुलैमध्ये डिलर्सना 7,675 सोनेटचा, 6,983 सेल्टॉसचा तसेच 358 कार्निवल कार्सचा पुरवठा केला होता. सदरच्या बँडने 2021 मध्ये एक लाख वाहनांच्या विक्रीचा आकडा पार केला आहे. बाजारातील सुधारलेल्या परिस्थितीचा फायदा हा कंपनीला झाला आहे.
संकट काळात सकारात्मक स्थिती
संकट काळात केलेल्या कामगिरीमुळे कंपनीने विक्रीत तेजी प्राप्त केली आहे. कोरोना नियमात शिथिलता दिल्याने वैयक्तिक वाहन मागणीत वाढ झाली आहे, असे किया इंडियाचे विक्री विभागाचे प्रमुख तेई-जिन पार्क यांनी स्पष्ट केले आहे. ………………….