सहा दिवस पोलीस कोठडी, दूध पावडर प्रकरणी आर्थिक व्यवहार
प्रतिनिधी/ बेळगाव
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या खळबळजनक सोने चोरी प्रकरणातील प्रमुख संशयित किरण वीरनगौडर याच्याविरूद्ध गुरुवारी रात्री उशीरा सीआयडी पोलिसांनी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला असून सध्या या प्रकरणाची चौकशी बेळगाव पोलीसच करीत आहेत. वीरनगौडरला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
बागलकोट जिल्हय़ातील जमखंडी येथे घडलेले दूध पावडर प्रकरण दडपण्यासाठी किरणने वरि÷ पोलीस अधिकाऱयांची बेळगाव येथे मांडवली केली होती. या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहारही झाल्याचा आरोप होता. आता याच प्रकरणात किरण विरूद्ध एफआयआर दाखर झाला असून यामुळे काही पोलीस अधिकारीही संकटात आले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार न्यायालयाच्या परवानगीने किरणला सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. त्याला एका प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यमकनमर्डी, संकेश्वर, हिरेबागेवाडी पाठोपाठ आता कॅम्प पोलीस स्थानकातही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशीही सीआयडीकडे सोपविण्याची शक्मयता आहे.
दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी जमखंडी येथे 12 टन क्षीरभाग्य योजनेतील दूध पावडर पोलिसांनी जप्त केली होती. अंगणवाडीतील मुले व गर्भवती महिलांना पुरविण्यासाठी सरकारने दिलेल्या दूध पावडरची काळय़ा बाजारात विक्री केली जात होती. या प्रकरणातील बडय़ा गुन्हेगारांना वाचविण्यासाठी बेळगाव येथे मोठा आर्थिक व्यवहार झाला होता.
दूध पावडर प्रकरणाचीही चौकशी सरकारने सीआयडीकडे सोपविली आहे. या प्रकरणी धरपकडही सुरू आहे. संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी व बडय़ा गुन्हेगारांना प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. याबरोबरच बागलकोट जिल्हय़ात मूळ प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला आहे. तपास सुरू आहे, असे सांगून त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.