सांगली / प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या बहुचर्चित पुणे मिरज ते लोंढा या रेल्वे मार्गावरील सुरू असलेल्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामांतर्गत किर्लोस्करवाडी ते भिलवडी या चौदा किलोमीटरच्या मार्गावर शनिवारी विजेवरील इंजिनाची चाचणी घेण्यात आली. या मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरून विजेवरील रेल्वे धावल्याने रेल्वे कर्मचारी वर्गाकडून आनंद व्यक्त करण्यात आला.