वार्ताहर /नंदगड
दिवाळी आली की, गल्लोगल्ली किल्ला तयार करण्याची मुलांची लगबग सुरु होते. एखाद्या चित्रात किंवा फोटो पाहून तसा किल्ला बनविला जातो. परंतु किल्ला प्रत्यक्षात कसा असतो, अशा लहान बालकांना माहित नसतो, बालवयातच मुलांनी किल्ले पहावेत, त्यातून स्वराज्याविषयी व त्या काळातील किल्ला बांधकामाची माहिती मिळावी, यासाठी कसबा नंदगड ग्रामस्थांनी गावातील पहिलीपासून एक दिवशीय सहल आयोजित केली होती. बालदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या प्रवासात दिडशे विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिवप्रेमी प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते.
कसबा नंदगड ग्रा. पं. चे अध्यक्ष महाबळेश्वर धबाले, माजी अध्यक्ष प्रविण पाटील, माजी मंडळ पंचायत प्रधान सिद्धोजी पाटील, गजानन पाटील, भालचंद्र पाटील, महेश पाटील, आप्पाजी पाटील, बाबाजी पाटील, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे सहाय्यक प्रबंधक एस. एन. विचारे, शंकुतला बळवंत पाटील, निलेश चौगुले, सुहास पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक आदीसह अन्य पालक उपस्थित होते.
प्रारंभी किल्ल्यावरील सिद्धेश्वराचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडे, देशभक्तीपर गिते सादर केली. यावेळी कै. बळवंत पाटील यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वहय़ांचे वाटप करण्यात आले. यावेळी एस. एन. विचारे, सुहास पाटील, पत्रकार आप्पाजी पाटील, यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची सविस्तर पाहणी केली.