प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावातील ज्ये÷ पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना ‘वृषभश्री’ हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. अखिल कर्नाटक जैन अल्पसंख्याक संघाच्यावतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गरग, जिल्हा धारवाड येथील श्री जयकीर्ती विद्यालय येथे हा पुरस्कार देण्यात येणार असून यावेळी बेळगाव विभागीय 9 वा जैन शिक्षक समावेश व श्री ज्ञानेश्वर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून कुंतीनाथ कलमनी हे जैन समाजामध्ये समाजसेवा करत आले आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.