प्रतिनिधी/ रत्नागिरी
कुंभार्ली घाट चेक पोस्ट येथे बनावट ई-पासने जिह्यात प्रवेश करणारी गाडी पोलिसांकडून पकडण्यात आल़ी पोलिसांकडून गाडीवरील क्यूआर कोड स्पॅन केला असता सदरचा प्रकार उघडकीस आल़ा याप्रकरणी गाडीचे चालक, सहचालक व मालकावर अलोरे शिरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
गाडीचे चालक पुष्पेंद्र नरसिंग शिंदे (24 ऱा खेर्डी चिपळूण), मालक रोशन सुरेश शिंदे (ऱा कळवणे ), तसेच सहचालक रेवण दत्तात्रय अडसूळ (23, ऱा चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिह्यात प्रवेशासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आह़े विविध चेक पोस्टवर या पासचे चेकींग पोलिसांकडून केले जात़े
कुंभार्ली घाट चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना सोमवारी इर्टीगा गाडी जिह्यात प्रवेश करत असल्याचे दिसून आल़ी या गाडीचा ई-पास पोलिसांकडून स्पॅन करण्यात आल़ा यावेळी हा पास बनावट असल्याचे पोलिसांना आढळून आल़े सदरचा बनावट ई पास सहचालक रेवण अडसूळ याने तयार केल्याचे समोर आले आह़े
ही कारवाई अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरिक्षक धनश्री करंजकर, सहाय्यक पोलीस फौजदार विजय केतकर, पोलीस हवालदार स्वप्नील साळवी, होमगार्ड यशवंत धांगडे, आदित्य कुळे यांनी केल़ी