चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांची माहिती
वाकरे / प्रतिनिधी
कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कायम व हंगामी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष, शासन नियुक्त प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांच्या त्रिस्तरीय समितीने सुचवलेली १२ टक्के वेतन वाढ १ नोव्हेंबर २०२१ पासून लागू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
दरम्यान गेले काही वर्ष कामगार प्रतिनिधी साखर कामगारांना वेतन वाढ देण्याची मागणी करीत होते. याबाबत साखर संघ अध्यक्ष, शासन प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने साखर कामगारांना १२ टक्के वेतन वाढ देण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे कुंभी कासारी कारखाने ही वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे चेअरमन नरके म्हणाले. या निर्णयामुळे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी व्हाईस चेअरमन निवास वातकर, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील, साखर कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी सुभाष गुरव, उपाध्यक्ष संदीप भोसले, सहचिटणीस अशोक पाटील, कामगार प्रतिनिधी सरदार पाटील, विलास गुरव, सखाराम पाटील, अविनाश पाटील, लेबर ऑफिसर डी.टी.देसाई उपस्थित होते.