कुंभोज / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे गेल्या पंधरा दिवसांत २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. परिणामी, गावात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता आज बुधवार दि. १२ ते १४ असे तीन दिवस गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नूतन प्रशासक एन.के.कांबळे यांनी दिली. परिणामी संचारबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या कडक कारवाई करण्याचे आदेश हातकणंगले पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिले आहेत.
या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिकांना गावातून बाहेर जाण्यास आणि गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचा गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिणामी चौकाचौकात विनाकारण बसणाऱ्या अनेक युवकांच्या टोळक्यांना पोलिसांनी चांगलाच दम दिला असून वेळेप्रसंगी लाठीकाठीचाही वापर करण्यात येत आहे. परिणामी कुंभोज परीसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पोलीस व कोरोना कमिटीचे, ग्रामपंचायत प्रशासकीय यांची कारवाई योग्य असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे .परिणामी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून कोरोनाची साखळी थांबवावी, अशी विनंती आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.