कुंभोज/प्रतिनिधी
कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या राज्यस्तरीय खेळाडू तसेच स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामसभेचे औचित्य साधून सरपंच माधवी माळी यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ करण्यात आला.
शितल पुंडलीक कोळी यांची वाहतूक निरीक्षक तसेच सचिन संजय चौगुले यांचे कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याबद्दल तर मुकदस मुबारक मुजावर यांना स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल तसेच अंकिता मारुती चव्हाण, संगीता आनंदा माळी, मनीषा राजेंद्र माळी यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी शीतल कोळी यांनी सत्कार प्रसंगी बोलताना, गावाने केलेल्या सहकार्यामुळे मी भारावून गेले असल्याचे मत व्यक्त केले. तर मी जे यश प्राप्त केले ते सर्व कुंभोज ग्रामस्थांचा सहकार्यामुळेच असल्याचे सांगत येणाऱ्या काळात आयपीएस अधिकारी होऊन कुंभोज गावचे नाव मी लौकिक करेन त्यासाठी कुंभोज ग्रामस्थांचे मला असेच सहकार्य राहू दे असेही मतही व्यक्त केले .
सदर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे वाटचाल पाहता कुंभोज याठिकाणी एमपीसी यूपीसी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत वाचन शाळा चालू करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. सदर निर्णयाचे गावातून सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील विविध तरुण मंडळे, समस्त कोळी समाज, समस्त मुस्लिम समाज, आरोग्य विभाग तसेच गावातील विविध संस्थांच्या पदाधिकार्यांच्या वतीने सर्वच विजय प्राप्त सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला.