वार्ताहर/कुडाळ
कुडाळ पाचवड रोडवर पियुष चौकामध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून अवैध दारू वाहतूक करत असताना मंगेश भरत निकम उर्फ मंगेश रामचंद्र निकम वय 29 राहणार करंदी तर्फ कुडाळ तालुका जावळी व बाबू हनुमंत बेलकर ब्27 करंजे तर्फ कुडाळ अशा दोन जणांना 62907 रुपये दारू मुद्देमाल सह मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी रंगेहात पकडले या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक एम एच 11 29 14 आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुडाळ पाचवड रोडवर पियुष चौकामध्ये संशयित आरोपी मंगेश भरत निकम व बाबू हनुमंत बेलकर हे पाचवड वरून करंदी तर्फ कुडाळ कडे दुचाकीवर देशी-विदेशी दारूच्या बाटल्या बॉक्स घेऊन अवैधरित्या दारू वाहतूक करत असताना ची माहिती मेढा पोलिस स्थानकाचे साहेब पोलीस निरीक्षक अमोल माने यांना मिळाली यावरच सापळा रचत पोलीस पेट्रोलिंग करताना कुडाळच्या पिऊश चौकामध्ये वाहन तपासणी करत असताना आढळले यांच्याकडून देशी दारू च्या पाच हजार 760 रुपये किमतीच्या 96 बाटल्या व विदेशी मॅकडॉल कंपनीच्या बाटल्या असे एकूण 65 हजार 960 रुपयाचा दारू मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला याप्रकरणी मेढा पोलिस स्थानकामध्ये दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार ओव्हाळ करत आहेत