नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
प्रियाच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रिडामंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत तिचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी लिहिलंय, “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक, हरियाणाची सुपुत्रीने हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने तिंच अभिनंदन.”
प्रिया मलिकने याआधी २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.