ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दूरचित्रवाहिन्यांना नेमका किती प्रेक्षक वर्ग लाभतो, याची अचूक माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मिळवणे सहज शक्य आहे, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांचे क्यूआर कोड तयार करता येतात. ते क्यूआर कोड प्रेक्षकांना स्कॅन करण्यास सांगितल्यास टीआरपी मोजणे शक्य होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सतत तपासणी चालू ठेवल्यास या प्रक्रियेतील बनावट क्यूआर कोड समोर येतील, त्यामुळे घोटाळे उघड होतील.
दूरचित्रवाहिनीवरील कोणते कार्यक्रम किती लोकांनी पाहिले याची माहिती डीटीएच ऑपरेटरकडे असते. ती माहिती संकलित केल्यास या प्रक्रियेतील विश्वासार्हता कायम राहण्यास मदत होईल, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.