2019 मध्ये प्रदर्शित तमिळ चित्रपट ‘कॅथी’च्या हिंदी रिमेकचे चित्रिकरण सुरू झाले आहे. चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. हिंदी रिमेकचे नाव ‘भोला’ असून याच्या नायिकेचे नाव देखील आता समोर आले आहे. भोला चित्रपटात तब्बू मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.
अजय आणि तब्बू यांची जोडी पडद्यावर उत्तम मानली जात राहिली आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यापूर्वी हे दोघे ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात दिसून आले होते.
भोला चित्रपटाच्या चित्रिकरणास गोरेगाव येथील फिल्मिस्तान स्टुडिओत सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेंद्र शर्मा करत आहेत. धर्मेंद्र हे अजय देवगण यांचे नातेवाईक आहेत. चित्रपटाचे सिनेमॅटोग्रॉफी असीम बजाज करणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणास प्रारंभ करण्यापूर्वी अजयने केरळमधील शबरीमला येथे जात भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे.