वृत्तसंस्था/ रोटरडॅम
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या विश्व टेनिस रोटरडॅम पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या फेलिक्स ऍलियासिमेने एकेरीचे जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील ऍलीसिमेचे हे पहिले विजेतेपद आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित ऍलियासिमेने ग्रीकच्या स्टीफानोस सित्सिपसला 78 मिनिटाच्या कालावधीत 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत एटीपी टूरवरील 500 दर्जाच्या या स्पर्धेत जेतेपद पटकाविले. ऍलियासिमेने या स्पर्धेत रशियाच्या रूबलेव्हचा उपांत्य सामन्यात पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.