ऑनलाईन टीम / टोरंटो :
उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने कॅनडामध्ये उष्ण वातावरण तयार झाले आहे. मागील सलग तीन दिवसांपासून कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात 49.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अचानक झालेल्या तापमान वाढीमुळे या देशात 130 जणांनी प्राण गमावले आहेत.
भीषण उन्हाळ्यामुळे कॅनडातील लोकांना घराबहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हापासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. मात्र, वाढते तापमान सहन न झाल्याने वँकूवरमधील 65, उपनगर बुर्नबेमध्ये 34 आणि सरेमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे.