ऑनलाईन टीम / टोरंटो :
कोरोनामुळे अनेक देश आता चीनविरोधात आक्रमक झाले आहेत. कॅनडाच्या टोरंटो शहरात आज भारतीय समुदायाच्या लोकांनी चीनविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी इतर देशांचे लोकही आपल्या देशाचा झेंडा घेऊन भारतासोबत सहभागी झाले होते.
कॅनडाच्या टोरंटोमध्ये चिनी दुतावासाबाहेर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या विरोधात भारतीयांनी निदर्शने केली. यामध्ये टोरंटोमधील स्थानिक लोक, इराणचे नागरीक, तिबेट आणि व्हिएतनामचे लोक सहभागी झाले होते. यापूर्वी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियातही नागरिकांनी चीनविरोधी निदर्शने केली आहेत.
इराण-चीनमधील एका करारामुळे इराणचे नागरिक चीनला विरोध करत आहेत. तर दक्षिण चायना समुद्रावरून व्हिएतनाम चीनला विरोध करत आहे. तर कॅनडा कोरोनामुळे चीनच्या विरोधात गेला आहे.